Ram Shinde on Ajit Pawar & Rohit Pawar in Karjat Jamkhed Assembly Election : “कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मी कटाचा बळी ठरलो”, असं येथील पराभूत उमेदवार व भाजपा नेते राम शिंदे यांनी म्हटलं आहे. माझा पराभव हा नियोजित कट होता आणि या कटात अजित पवार सहभागी असल्याचा संशय शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच, “अजित पवारांनी रोहित पवारांच्या विरोधात सभा घेतली असती तर काय झालं असतं?” असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. पराभवानंतर राम शिंदे म्हणाले, “त्यांच्या (पवार कुटुंब) राजकीय सारीपाटात माझा बळी गेला आहे”. कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांनी भाजपा उमेदवार राम शिंदे यांचा १,२४३ मतांनी पराभव केला आहे. रोहित पवारांना १,२७,६७६ मतं मिळाली आहेत. तर, राम शिंदे यांना १,२६,४४३ मतं मिळाली आहेत. या पराभवानंतर राम शिंदे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. यावर आता स्वतः रोहित पवारांनी उत्तर दिलं आहे.