२६ नोव्हेंबर २०१९ रोजी अस्तित्वात आलेल्या १४ व्या विधानसभेची मुदत आज (२६ नोव्हेंबर) संपणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही महायुतीने अद्याप सत्ता स्थापन केलेली नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्रिपदाबाबतच्या चर्चांसाठी महायुतीतील नेत्यांची धावपळ सुरू आहे. त्यामुळे विधानसभेची मुदत संपल्यानंतर राज्यात राजकीय स्थिती काय असणार? राष्ट्रपती राजवट लागणार का? कोणाच्या हातात असणार सत्तेच्या चाव्या असे असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत.