महायुतीत सध्या मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना आणि भाजपा अशा दोन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते मुख्यमंत्री पद आपल्याच पक्षाला मिळावे, यासाठी आग्रही आहेत. शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी शिवसेनेचे नेते मैदानात उतरले आहेत. काही नेत्यांनी शिवसैनिकांना मुंबईत येण्याचे आवाहन केल्यामुळे असंख्य कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यातून परिस्थिती चिघळू नये, यासाठी आता एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावनिक आवाहन केले आहे.