Eknath Shinde Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना भेटून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा (Eknath Shinde Resign) दिला आहे. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती (Maharashtra CM) करत असल्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले.