मुख्यमंत्री कोण होणार? यावरून महायुतीमध्ये वाद सुरू आहे, असं म्हटलं जात आहे. आता यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केलं आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले होते. त्यांचे ५७ आमदार निवडून आले आहेत. हा आकडा खूपच चांगला आहे. पण भाजपाचे १३२ आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे भाजपा पक्षाने मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. तसेच भाजपा पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र एकनाथ शिंदे नाराज दिसत आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याची गरज आहे.”, असं आठवले म्हणाले.