दहिसर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजेश येरूणकर यांनी मतमोजणी आणि ईव्हीएम मिशानच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. राजेश येरूणकर यांना केवळ दोन मते मिळाली आहेत. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन संताप व्यक्त केला.”म्हणजे माझ्या आई आणि बायकोनेही मला मतदान केले नाही का?”, असा संतप्त सवाल राजेश येरूणकर यांनी उपस्थित केला.