देशभभरात आज (२६ नोव्हेंबर) ७५ वा संविधान दिन साजरा केला जात आहे. आज ठिकठिकाणी संविधान बचाओ रॅली काढण्यात आल्या. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर काँग्रेसने मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी या कार्यक्रमाला संबोधित केलं. मात्र, राहुल गांधी यांचं भाषण चालू असताना अचानक माईक बंद पडला. त्यानंतर काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते गोंधळ घालू लागले. सभेच्या ठिकाणी लावलेला माईक बराच वेळ बंद होता. काही वेळाने माईक दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर राहुल गांधी पुन्हा भाषण करायला उभे राहिले.