महाराष्ट्रात जे काही घडलंय त्याला माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड जबाबदार असल्याचा दावा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी संजय राऊतांनी डी. वाय. चंद्रचूड यांच्याबाबत राग व्यक्त केला होता. दरम्यान, एएनआयला चंद्रचूड यांनी दिलेल्या मुलाखतीत संजय राऊतांच्या आरोपांवर उत्तर दिलं आहे.