भाजपाने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब केलं आहे. दरम्यान, भाजपाने मुख्यमंत्री पदाबाबत स्पष्ट संदेश दिल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा नूर बदलला आहे. निकालानंतर आक्रमक झालेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आता मवाळ झाले आहेत. यातच, एकनाथ शिंदेंना अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं होतं, अशीही चर्चा सुरू झाली आहे. याबाबत भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी भाष्य केलं आहे.