महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून सध्या तिढा निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. यासंदर्भात नेमकी घोषणा कधी होणार याबाबत चर्चा सुरू आहे. याविषयी आमदार चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं अजित पवारांनी म्हटलं आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.