माहीम विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले अमित ठाकरे आता पुन्हा कामाला लागले आहे. विधानसभेत जाण्याची संधी जनतेने दिली नसली तरीही ते पुन्हा जनकार्यात उतरले आहेत. आज त्यांनी सायन कोळीवाडा येथील मुलीवर अत्याचार आणि ड्रग्सविक्री संदर्भात थेट इशारा दिला आहे. हे शब्द नाहीत तर इशारा आहे, असं म्हणत त्यांनी आज समाज माध्यमावर पोस्ट केली.