Eknath Shinde Narendra Modi Call: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळूनही आज तीन दिवस उलटून गेले तरी मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय झालेला नाही. दरम्यान आज स्वतः काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाच्या तिढ्याबाबत महत्त्वाचं विधानं केलं आहे, यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह झालेल्या कॉलबाबत सुद्धा शिंदेंनी माहिती दिली आहे.