राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठा विजय मिळाला. असे असले तरी, यामध्ये महायुतीतील काही दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामनाही करावा लागला. या पराभूत झालेल्या उमेदवारांमध्ये शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांचाही समावेश आहे. मुंबईतील जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून मनीषा वायकर यांचा सुमारे १५०० मतांनी पराभव झाला. या पराभवानंतर मनीषा वायकर फेर मतमोजणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.