Sanjay Raut On Eknath Shinde As CM Candidate:महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात २७ तारखेला पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. “कुठल्याही पदापेक्षा लाडक्या बहिणींचा लाडका सख्खा भाऊ ही माझी ओळख सर्वाधिक मोठी आहे.” असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच त्यांनी अप्रत्यक्षरित्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचे संकेत सुद्धा दिले. दुसरीकडे राऊतांच्या टीकेवर माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी कानउघाडणी केली होती. या सगळ्या मुद्द्यांवर आज खासदार संजय राऊत नेमकं काय बोलणार हे आपण पाहणार आहोत.