Shrikant Shinde Emotional Post For Eknath Shinde : महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २६ तारखेला त्यांच्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. त्यानंतर ठाण्यात २७ तारखेला पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? या चर्चा होत असतानाच एकनाथ शिंदे इच्छुक आहेत या चर्चाही घडल्या. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मी सर्वाधिकार देतो आहे. मोदी जे नाव जाहीर करतील ते मान्य असेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसतील अशी चर्चा सुरु झाली आहे.यानंतर त्यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे ( Shrikant Shinde ) यांनी वडिलांसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे ज्याची चर्चा आहे.