शिवसेनेचे (ठाकरे) प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर टीका केली आहे. बहुमत मिळूनही महायुतीला मुख्यमंत्री ठरवण्यास इतका वेळ का लागतोय? असा सवाल संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. तसेच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत घेतलेल्या भूमिकेवरही संजय राऊत यांनी टीका केली आहे.