Devendra Fadnavis On Eknath Shinde as Maharashtra New Chief Minister: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर २७ नोव्हेंबरला काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाबाबत महत्त्वपूर्ण विधान करत मोदी (Modi) निर्णय घेतील ते मान्य असेल असं सांगितलं. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, आम्ही सगळे एकत्रित आहोत एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील आमच्या महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत आम्ही निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं. सगळे निर्णय सोबत बसून होतील पक्षश्रेष्ठी आमच्या सोबत बसून निर्णय घेतील. कोणाच्या मनात किंतु परंतु असेल तो एकनाथ शिंदे यांनी दूर केला आहे, पुढच्या प्रक्रियेसाठी पक्षश्रेष्ठीं सोबत आमची बैठक होईल.आज अमित शाह व मोदींसह दिल्लीत बैठक पार पडणार असून आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष याकडेच लागून आहे.