Mumbai Police Receives Threat Call For PM Narendra Modi: मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात बुधवारी रात्री एका महिलेने दूरध्वनी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची तयारी सुरू असून त्यांच्याकडे शस्त्र असल्याचे सांगितले. त्यानंतर महिलेने दूरध्वनी बंद केला. हा दूरध्वनी आल्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षात एकच खळबळ उडाली. सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले. त्यानंतर महिलेला वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण उत्तर मिळाले नाही. अखेर या घटनेची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली आणि तातडीने फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला. दरम्यान, दूरध्वनी करणाऱ्या महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.