२३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. सत्ताधारी महायुतीला अभूतपूर्व असं यश मिळालं. पण निकाल लागल्यानंतर आज पाच दिवस उलटूनही राज्यात सत्तास्थापनेच्या ठोस अशा हालचाली दिसत नसल्याने सगळेच संभ्रमात पडले आहेत. एकीकडे एकनाथ शिंदे व अजित पवार या दोघांनीही भाजपा मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेईल तो मान्य असेल असं जाहीर केलं असताना अद्याप भाजपाकडून त्यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याचदरम्यान अजित पवारांनी सत्तेचं स्वरूप कसं असेल, याबाबत मोठं विधान केलं आहे.