महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जो निकाल लागला त्यावर आता महायुतीमधील पक्ष सोडले तर इतर विरोधक टीका करत आहेत. मविआचे घटक पक्ष, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी व अपक्षांनीही निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. रात्री मतदानाच्या वाढलेल्या आकडेवारीवरून प्रश्न उपस्थित होत आहेत. याविषयी आता महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयोगाने सविस्तर माहिती दिली आहे.