मुंबईत शुक्रवारी महायुतीची होणारी बैठक अचानक रद्द झाली. त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या गावी दोन दिवसांच्या मुक्कामासाठी गेले आहेत. दरम्यान शिवसेनेचे (शिंदे गट)आमदार संजय शिरसाट यांनी यासंदर्भात सूचक विधान केल्याने आता अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.