मराठवाड्यात माझ्याएवढा सिनिअर आमदार कुणीही नाही. माझ्यावर १०० रुपयांचा अपहार केल्याचाही डाग नाही,त्यामुळे मंत्रिपदासाठी मला मेरीटवर संधी द्या, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याची कबुली जालन्यातील परतूरचे भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी एका कार्यक्रमात जाहीर केलीय.