ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या आंदोलनस्थळी आज शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हातून पाणी पिऊन उपोषण सोडलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सत्तास्थापनेसाठी झालेल्या विलंबावरून महायुतीवर टीका केली आहे. तर काळजीवाहू मुख्यमंत्री गावी गेले असून त्यांचं नाव न घेता ठाकरेंनी खोचक टोला लगावला आहे.