जयपूर येथे आयोजित ५१ व्या ‘जेम अँड ज्वेलरी’ पुरस्कार सोहळ्यानिमित्त बोलत असताना अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी अमेरिकेतील न्यायालयाने लावलेल्या आरोपांचा समाचार घेतला. आमच्याविरोधात आरोप होण्याची ही पहिली वेळ नाही. “आमच्यावर होणारा प्रत्येक आरोप आम्हाला आणखी बळकट करतो. प्रत्येक अडथळा अदाणी समूहासाठी यशाची पायरी बनते. आम्ही यातून बाहेर पडू”, असे गौतम अदाणी या सोहळ्यात बोलताना म्हणाले.