शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे प्रसार माध्यमांशी संवाद साधत आहेत. विधानसभा निकालावरून विरोधकांनी आता इव्हीएमचा मुद्दा लावून धरला आहे. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनीदेखील याविरोधात आत्मक्लेश आंदोलन पुकारलं होतं. शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हो आंदोलन मागे घेतलं. दरम्यान, आता इव्हीएमविरोधात मविआची पुढची दिशा काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.