राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील त्यांच्या दरे गावी असून त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत आता संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे यांची प्रकृती नाजूक आहे. शपथविधीला ते येणार का? या चिंतेत अनेक लोक आहेत, असं सूचक विधानही त्यांनी केलं.