विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाला आहे. मात्र निकालावरून विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच काही मतदारसंघात मतांच्या आकडेवारीत तफावत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. त्यामुळे काही उमेदवारांनी मत पडताळणीसाठी अर्ज केला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) युगेंद्र पवार यांचाही समावेश आहे. याविषयी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.