काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारपासून त्यांच्या दरे गावी आहेत. दोन दिवसांनंतर आज त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे अचानक गावी गेल्याने अनेक चर्चा रंगल्या होत्या. तसंच गृहमंत्रिपदासाठी शिंदे गट आग्रही असल्याची देखील चर्चा आहे. याविषयी शिंदे यांनी सविस्तर भूमिका मांडली?