राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे नागपूरमधील एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशामागे संघाचा मोठा हात असल्याची चर्चा आहे. याविषयी मोहन भागवत काय भूमिका मांडणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.