जरांगे (Manoj Jarange) पाटील हे आंतरवली सराटी येथून रविवारी तुळजापूर आणि पंढरपूर येथे दर्शनासाठी निघाले होते. धाराशिव जिल्ह्यात त्यांचा ताफा दाखल होताच ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. कुलस्वामीनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आरक्षणाची यापुढील लढाई सामूहिक आमरण उपोषणाने केली जाईल. कदाचित हे उपोषण मुंबई येथे आझाद मैदानावरही होऊ शकते. आता आरक्षणाची ही चळवळ थांबवणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.