शिवसेना शिंदे गटाकडून गृहमंत्रिपदाची मागणी केली जात आहे. त्यामुळे सत्तास्थापनेचं घोडं अडलं आहे, अशी चर्चा आहे. यावरून शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि शिंदे गटावर टीकास्त्र डागलं आहे. तसंच शिंदे गटाला गृहमंत्रिपद का हवं आहे, याबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे.