काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जाहीर टीका केली म्हणून मध्य नागपूरचे काँग्रेसचे पराभूत उमेदवार बंटी शेळके यांना प्रदेश काँग्रेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पण त्यानंतरही शेळके शांत बसले नाही. रविवारी त्यांनी पुन्हा पटोलेंवर तोफ डागली. त्यांनी पुन्हा पटोलेंवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट असल्याचा आरोप केला. पण नेमकं प्रकरण काय आहे? बंटी शेळकेंने नाना पटोलेंवर हे आरोप का केलेत? याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.