Palghar MNS Party Worker Beaten, Avinash Jadhav Accused: विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. लोकसभा निवडणुकीत उभ्या केलेल्या उमेदवारांना अपेक्षित अर्थसहाय्य मिळालं नसल्याची तक्रार केल्याच्या काही तासातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर चे लोकसभा अध्यक्ष समीर मोरे आणि त्यांचे भाऊ आतिश मोरे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. मनसेचे ठाण्यातील नेते आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि त्यांच्यासोबत असलेल्या १५ ते २० जणांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे. हे एकूण प्रकरण काय आणि यावर आता राज ठाकरे काही भूमिका घेणार का याविषयीची सविस्तर माहिती इथे पाहा.