Avinash Jadhav Resignation MNS Raj Thackeray Call: ठाणे पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाचा राजीनामा दिला होता. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत हा निर्णय घेतल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले होते मात्र आता राज ठाकरेंनी अविनाश जाधव यांना एक कॉल करताच त्यांनी नव्या व्हिडिओच्या माध्यमातून आपला निर्णय बदलत असल्याचे जाहीर केलं आहे.