दलित, ओबीसी, अल्पसंख्याक आणि आदिवासी संघटनांच्या महासंघाच्यावतीने संविधानाच्या संरक्षणासाठी महारॅली दिल्लीतील रामलीला मैदानात रविवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. दरम्यान, हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी अजमेर शरीफ दर्गा या श्रद्धेय सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याच्या सर्वेक्षणाची मागणी केली. अजमेर येथील एका न्यायालयाने बुधवारी (२७ नोव्हेंबर) ही याचिका मान्य केली. यावरून खरगे यांनी मुसलमानांनी बांधलेला लाल किल्ला, ताज महाल पण तोडून टाका अशी टीका केली आहे.