Bharat Gogawale on Eknath Shnde : देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असून त्यांच्या नावावर भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केलं आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास राजी झाले असले तरी गृहमंत्रीपद मिळावं यास या मागणीवर ते ठाम आहेत. दुसऱ्या बाजूला गृहमंत्रीपद सोडण्यास भाजपा व देवेंद्र फडणवीस तयार नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता गृहखात्यावरून महायुतीत तिढा वाढला आहे. दरम्यान, यावर एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय व त्यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार भरत गोगावले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. गोगावले म्हणाले, “शिवसेनेने कुठलाही हट्ट धरलेला नाही. तसेच महायुतीबाबत प्रसारमाध्यमं सूत्रांच्या हवाल्याने ज्या बातम्या देत आहेत, त्यात तथ्य नाही. शिवसेनेने गृहमंत्रीपदाचा हट्ट धरल्याच्या बातम्या सूत्रांच्या हवाल्याने दिल्या जात आहेत”.