Sudhir Mungantiwar on Mukhyamantri Ladki Bahin Yojana Next Installment 2100 Rs: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने राज्यातील महिलांना आश्वासन दिलं होतं राज्यात पुन्हा सत्ता मिळाली तर आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा २,१०० रुपये देऊ. राज्यात आता महायुतीची सत्ता आली आहे. त्यामुळे या योजनेतील पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यात २,१०० रुपये कधी येणार याची प्रतीक्षा आहे.दरम्यान, महिलांना २१०० रुपये मिळण्यास ७ ते १० महिने लागू शकतात असं दिसतंय. सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच दी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली. या मुलाखतीवेळी त्यांनी लाडकी बहीण योजना, या योजनेबाबत महायुतीची भूमिका, निवडणुकीआधी दिलेलं आश्वासन व त्यावरील वाढीव खर्चाबाबत रोखठोक भूमिका मांडली.