Bachhu Kadu On Eknath Shinde: गरज सरो वैद्य मरो हा भाजपचा धर्म आहे असं म्हणत आज बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा भाजपाला लक्ष्य केलं आहे. एकनाथ शिंदे हे एक मात्र मुख्यमंत्री होते जे दोन वाजता सुद्धा सामान्य माणसाला भेटत होते त्यामुळे भाजपाला वाटले होते की शिंदेंना थोडं दाबून ठेवू, सत्तेत असताना ते दाबू शकले नाहीत, त्यांचे काम बोलत होते त्यांचा कोंडी करण्याचा प्रयत्न होणारच होता कारण भाजपला एक हाती सत्ता घ्यायची आहे असं म्हणत त्यांनी शिंदेंची बाजू घेत भाजपाला ऐकवलं आहे. बच्चू कडू यांनी यावेळी मोहन भागवत यांचे अपत्यांवरून केलेले विधान ते गुलाबराव पाटील यांनी १०० जागा निवडून येण्याचा केलेला दावा या सगळ्यावर उत्तर दिले आहे.