काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावावरून परतल्यानंतर आज ठाण्यात त्यांच्या घरी शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला आमदार संजय शिरसाट देखील उपस्थित होते. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संभाव्य मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड मागवल्याची माहिती समोर आली आहे. याविषयी शिरसाट यांना विचारले असता ते म्हणाले की, रिपोर्ट कार्ड मागवणे हा प्रक्रियेचा भाग आहे. मंत्री करत असताना त्यांच्या संबंधित माहिती मागवली जाते, असं शिरसाट म्हणाले.