राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात मोठे बदल होणार याबाबतचं सूचक विधान आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना पक्षात पुन्हा भाकरी फिरवली जाणार यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्याबद्दल त्यांनी सूचक विधान केलं आहे. तसंत येत्या काळात नवी संधी मिळणार याविषयी देखील रोहित पवारांनी भाष्य केलं आहे.