भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी रात्री ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सव्वा तास चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. मंत्रिपदावरून महायुतीत धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांना प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारला त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, शिंदेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. तसेच महायुतीत मतभेद नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.