सोमवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते अजित पवार हे दिल्लीत पोहोचले. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात होते, मात्र अमित शाह चंदीगड दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची भेट झालेली नाही. आज सायंकाळी कदाचित भेट होऊ शकते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. त्यामुळे शपथविधी आधी अजित पवारांच्या या दिल्ली दौऱ्यावरून नेमकी काय चर्चा रंगलीय ते पाहू.