MPSC Gazetted Civil Services Joint Prelims Exam-2024: सोशल मीडियावर एखादी अत्यंत टाकाऊ माहिती देणारी रील पहिली की त्याखाली थांब थांब हे लिहून घेतो MPSC ला विचारतील अशी कमेंट येते. तुम्हीही पहिली असेलच ना? पण आता खरोखरच MPSC च्या परीक्षेत काही अजब प्रश्न विचारल्याची चर्चा सुरु आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २५ ऑगस्टला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा रद्द केली होती. परीक्षेची तारीख जाहीर न झाल्याने विद्यार्थी आता आक्रमक झाले होते. तारखेअभावी विद्यार्थ्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडल्याने काहींनी आयोगाच्या अशा दिरंगाई विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. कृषी विभागातील पदांचा समावेश करण्यासाठी आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलली होती. राज्य शासनाकडूनही आयोगावर परीक्षण पुढे ढकलण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. या संपूर्ण घटनाक्रमानंतर एक डिसेंबरला ही परीक्षा पार पडली आहे.