Eknath Shinde Health Update Admitted in Jupiter Hospital : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोणाच्याही संपर्कात नव्हते. दिल्लीतील बैठक संपल्यानंतर ते थेट दरे या त्यांच्या गावी गेले. तेथून परतल्यानंतरही त्यांची प्रकृती सुधारली नसून आज त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर रु्गणालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना घशाचा संसर्ग झाला असून ताप आणि अशक्तपणा असल्याचं शिवसेनेचे नेते सांगत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीवरून शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते संजय शिरसाट आणि शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.