विधानसभा निवडणुकीत स्ट्राईक रेटमध्ये भाजपाच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) दुसरा क्रमांक आहे. तर शिंदे गटाचा तिसरा क्रमांक आहे. दोन आणि तीन नंबरमध्ये थोडासा फरक आहे. आमचा स्ट्राईक रेट चांगला असून आम्हालाही त्यांच्या एवढ्या जागा द्या, अशी मागणी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.