बाटलीबंद पाण्याला ‘मिनरल वॉटर’ किंवा ‘पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर’ असं संबोधलं जातं. हे पाणी शुद्ध आहे असं आपण मानतो. काही कंपन्या दावा करतात की त्यांनी यात मिनरल्स मिसळले आहेत. या पाण्याने आपल्याला कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही, असं आपण मानतो. परंतु, बाटलीबंद पाणी पिणाऱ्यांसाठी आणि हे पाणी विकणाऱ्या कंपन्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणानेम्हटलं आहे की हे पाणी आपल्यासाठी घातक ठरू शकतं.