राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोणाच्याही संपर्कात नव्हते. दिल्लीतील बैठक संपल्यानंतर ते थेट दरे या त्यांच्या गावी गेले. तेथून परतल्यानंतरही ते आज ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी गेले होतो. आता वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे ज्युपिटर रुग्णालयातून वर्षा निवासस्थानी रवाना झाले आहेत.