राज्यात शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. निर्वावाद बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. मुख्यमंत्री आणि इतर खात्यांबाबत अद्यापही अधिकृत माहिती आलेली नसली तरीही शपथविधीच्या तयारीला वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक देशभरातली अनेकमान्यवरांना शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केलं जाणार आहे. दरम्यान, या शपथविधीला नागपुरातील एका चहाविक्रेत्यालाही आमंत्रण मिळालं आहे.