Markadwadi Malshiras Solapur Uttam Jankar vs Ram Satpute Voting: आमची डोकी फुटली, गोळ्या जरी झाडल्या तरी आम्ही बॅलेटपेपर वरच मतदान करू असा एल्गार केलाय महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्याश्या गावाच्या ग्रामस्थांनी. सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी हे अगदी लहानसं गाव. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तमराव जानकर निवडून आलेत. पण ग्रामस्थांचे म्हणणे असे आहे की त्यांना मिळणारे मताधिक्य अतिशय कमी आहे म्हणून गावाने चक्क मतपत्रिका वापरून पुन्हा मतदान प्रक्रिया करायची असा निर्णय घेतला होता. ‘ईव्हीएम’वर (EVM) आक्षेप घेत सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची परवानगी प्रशासनाकडे मागितली होती मात्र प्रशासनाने परवानगी नाकारल्याने आता ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.