Balasaheb Thorat Emotional: कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या विधानसभा निवडनुकीतील भराभवानंतर त्यांनी आज संगमनेरात सभा घेतली व या सभेनंतर ते जनतेत जात काहिसे भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.आपल्या पराभव नंतर बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते व या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. सभा आवरल्यानंतर बाळासाहेब थोरातांनी सर्वांच्या भेटीगाठी घेत ते काहीसे भावनिक झाले होते. सभेनंतर जवळपास अर्धा तास ते आलेल्या कार्यकर्त्यांमधे जात हात मिळवत फोटो काढत होते.